Chinchwad Bye-Election : दलितांचे आरक्षण धोक्यात, भाजपला पराभूत करा – ॲड. जयदेव गायकवाड

एमपीसी न्यूज – राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार (Chinchwad Bye-Election) हे आरक्षणाला विरोध करणारे आहे. दलितांचे आरक्षण या सरकारने धोक्यात आणण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे दलितविरोधी आणि संविधानविरोधी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख ॲड. जयदेव गायकवाड यांनी केले.

पिंपळे सौदागर येथे पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. संजय कांबळे, पंडित कांबळे, दत्ता गायकवाड आणि मयूर जाधव उपस्थित होते. आंबेडकरी विचारांचा वारसा चालवायचा असेल आणि सत्तेत वाटा मिळवायचा असेल. तर भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवावे लागेल.

परंतु, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर भाजपला पूरक भूमिका घेत आहेत. त्यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांचा पराभव झाला. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भारतीय जनता पक्षाला झाला, असे गायकवाड यांनी सांगितले.

Chinchwad Bye-Election : भाजपच्या पराभवाची सुरुवात पोटनिवडणुकीतून होईल – छगन भुजबळ

प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणातून दलित समाजाच्या हिताचे रक्षण होणार नाही. त्यामुळे 17 वर्ष त्यांच्या सोबत काम केल्यानंतर मी बाजुला झालो तसे पिंपरी-चिंचवड शहरातील त्यांचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे हेही बाजूला (Chinchwad Bye-Election) झाले. भाजपला पूरक भूमिका घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला केलेले मतदान हे संविधानावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या पथ्यावर पडणारे आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.