Chinchwad Bye Election : देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीवरून शंकर जगताप यांच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा???

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye Election) सध्या उमेदवारी कोणाला मिळणार? यावरून सध्या चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शंकर जगताप यांना दिलेली भेट ही नव्या चर्चेचे कारण बनले आहे. यावर आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण शंकर जगताप यांनी दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीवरुन थेट दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी गेले. यावर शंकर जगताप यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले, की फडणवीस यांना शोक सभेनंतर आमच्या घरी येयचेच होते. पण, वेळेअभावी त्यांना शक्य झाले नाही. आज त्यांना वेळ मिळाल्याने केवळ सांत्वन म्हणून ते घरी आले. आमच्यात बंद दाराआड कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

Chakan : चाकणला 21 हजार 500 पिशवी कांद्याची आवक; भावात अपेक्षित सुधारणा नाही

शंकर जगताप यांनी असे कारण दिले असले, तरी सध्या भाजपकडून (Chinchwad Bye Election) पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी तर बंधु शंकर जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाणार आहे. जर या निवडणुकीत अश्विनी जगताप उभ्या राहिल्या तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे इतर पक्षांची भूमिका आहे; त्यामुळे शंकर जगताप यांची मनधरणी करायला देवेंद्र फडणवीस गेले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.