Chinchwad Bye Election : चिंचवडमध्ये 50 हजार मतदार वाढले, 5 लाख 66 हजार मतदार ठरविणार आमदार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून 5 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. (Chinchwad Bye Election) यादीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.  पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवडमध्ये 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीवेळी 5 लाख 16 हजार 836 मतदार होते. मागील तीन वर्षात 49 हजार 552 मतदार वाढले आहेत. ही वाढलेली मते पोट निवडणुकीत निर्णायक ठरु शकतात.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघ असून 5 लाख 66 हजार 415 मतदार आहे. हे मतदार पोटनिवडणुकीत मतदानांचा हक्क बजावणार आहेत. मतदार ओळख पत्राला आधार कार्ड लिंक, नाव, वय, पत्यात दुरुस्ती, मयत व नवीन नोंदणी अशा दुरुस्त्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने 5 जानेवारी रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.

Pune News : 22 जानेवारीला एक दिवसीय विद्वत संमेलन

त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहे. त्यात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 महिला आणि 35 इतर मतदार आहेत. हेच मतदार आता चिंचवडचा नवीन आमदार ठरविणार आहेत.

दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून  लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. जगताप, कलाटे यांच्यासह 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जगताप यांना 1 लाख 50 हजार 723 तर अपक्ष कलाटे यांना 1 लाख 12 हजार 225 मते मिळाली होती. (Chinchwad Bye Election) अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी बाजी मारत आमदारकीची हॅट्रिक केली होती. जगताप यांचे मताधिक्य कमालीचे घटले होते. आता पोटनिवडणुकीत किती उमेदवार असतील, कोण आमने-सामने येते की निवडणूक बिनविरोध होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.