रविवार, जानेवारी 29, 2023

Chinchwad Bye Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असे तर्क लावू नका – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडीकडून दोन (Chinchwad Bye Election) दिवसांमध्ये चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात  चित्र स्पष्ट होऊ शकते असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच ही निवडणूक बिनविरोध होईल, असा तर्क न लावण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळेल.

Alandi : माघी गणेश जयंती निमित्त थेऊरमध्ये चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की महाविकास आघाडीची बैठक सुरु आहे. त्यातून सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांची उपस्थिती होती. पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक भेटीगाठी सुरु आहेत.

येत्या दोन ते तीन दिवसांत पोटनिवडणुकीबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे महाविकास (Chinchwad Bye Election) आघाडीकडून चिंचवडसाठी कोणता उमेदवार दिला जाईल याकडे लक्ष लागले आहे.

 

Latest news
Related news