Chinchwad Bye-Election : पक्षाच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जवळ येत आहे तसे राजकीय घडामोडींना वेग येवू लागला आहे. (Chinchwad Bye-Election) विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहे. त्यापूर्वीच महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार असलेल्या नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही भाजप किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे ठरले नाही. उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र की स्वतंत्र लढणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Pune News : बीडच्या शौर्यची एक दिवसीय सामन्यात 250 धावांची तुफान खेळी

असे असताना राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने चर्चेला उधाण आले आहे. काटे यांनी 2014 मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पोटनिवडणूक लढविण्यासाठी काटे तीव्र इच्छुक आहेत. आता पक्ष कोणाला उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत बोलताना नाना काटे म्हणाले, ”मी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अजितदादांसोबत आज बैठक आहे.  पक्षाकडून आदेश आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा पूर्व (Chinchwad Bye-Election) तयारी म्हणून अर्ज घेतला आहे. अजितदादा जे निर्देश देतील. त्यानुसार आम्ही पुढचे पाऊल उचलू. चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व योग्य निर्णय होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.