Chinchwad Bye-Election : पोटनिवडणुकीसाठी ‘या’ दोघांनी केले तीन उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye-Election) आज (बुधवारी) दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. आज एकानेही उमेदवारी अर्ज घेतले नाहीत.

पोटनिवडणुकीसाठी मंगळवार पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. काल पहिल्याचदिवशी 20 जणांनी अर्ज नेले होते. आज दुस-या दिवशी अॅड. अनिल सोनावणे यांनी दोन तर मिलिंद कांबळे यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कधीपर्यंत दाखल करता येणार आहेत अर्ज?

31 जानेवारी – उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली

7 फेब्रुवारी – उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

8 फेब्रुवारी –  अर्जांची छाननी

10 फेब्रुवारी – अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

26 फेब्रुवारी – मतदान

2 मार्च – मतमोजणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.