Chinchwad Bye-Election : ‘आप’कडून चिंचवड पोटनिवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती

एमपीसी न्यूज : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आम आदमी पार्टीच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या. शहरातून सहा इच्छुक उमेदवारांनी राज्यासह शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर मुलाखती दिल्या.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रभारी हरिभाऊ राठोड, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष वहाब शेख, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, उपाध्यक्ष महेश बिराजदार, शहर प्रवक्ते कपिल मोरे महिला आघाडी अध्यक्षा स्मिता पवार, महिला आघाडी सचिव सीमा यादव सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दीपक श्रीवास्तव सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष विजयकुमार अबड सामाजिक न्याय विभाग सचिव सतीश नायर आदींच्या उपस्थितीत इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

चिंचवड विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामध्ये आम आदमी पार्टी देखील रणांगणात उतरली आहे. पक्षाकडून इच्छुकांची मुलाखत घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. एक ते दोन दिवसात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार आहे, (Chinchwad Bye-Election) अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हरिभाऊ राठोड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आणि उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या. त्यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.