Chinchwad Bye Election : पोटनिवडणुकीतील उमेदवाराबाबत जगताप परिवार व वरिष्ठ नेते निर्णय घेतील – उमा खापरे

एमपीसी न्यूज – चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाबद्दल सर्वच कार्यकर्त्यांना मोठे दुख: झाले आहे. ते अत्यंत आदरणीय, शहराचे लोकनेते होते. (Chinchwad Bye Election) त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असावा याबाबतचा निर्णय जगताप कुटुबियांनी घ्यायचा आहे. कुटुंबातील कोणी निवडणूक लढवायची हे त्यांनी ठरवायचे आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील. त्यानुसार आम्ही काम करु असे स्पष्टीकरण विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिले.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी  दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजपसह भाजपविरोधकही कमालीचे सक्रिय झाले आहेत. भाजपमध्ये उमेदवारीवरुन घमासान सुरु असून दोन गट पडल्याची चर्चा आहे.

Alandi News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरवात

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे म्हणाल्या, ”आमदार लक्ष्मणभाऊंचे निधन झाल्यामुळे चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. (Chinchwad Bye Election) उमेदवार कोण असावा याचा निर्णय जगताप परिवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे. उमेदवार कोण असावा हा जगताप परिवाराचा कौटुंबिक प्रश्न आहे. हा निर्णय पूर्णपणे जगताप कुटुबियांनी घ्यायचा आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील. त्यानुसार आम्ही काम करु, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.