Chinchwad Bye-Election : भाजपला मताधिक्याने निवडून देण्याचा कोकणवासीयांचा निर्धार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye-Election) भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार कोकणवासीयांनी केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. आमदार निलेश राणे यांनी काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवडगाव सांगवीसह मतदारसंघातील अन्य भागात जाऊन सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील नागरिकांशी संवाद साधला. काही भागात त्यांनी पदयात्राही काढली.

तसेच, सांगवीमध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात कोकणवासीयांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, सुनील पालकर, ऍड. चंद्रकांत गायकवाड यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chinchwad Bye-Election : आचारसंहिता कक्षाकडून 4 हजार पोस्टर, बॅनर्सवर कारवाई

काळेवाडी विजयनगर येथील कोपरा सभेत बोलताना आमदार भरत गोगावले यांनी संवाद साधला. ”लक्ष्मण जगताप यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यासाठी अश्विनीताईंना भरघोस मतांनी निवडून द्या. ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे,” असे मत भरत गोगावले यांनी व्यक्त केले.

भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना (Chinchwad Bye-Election) या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला आपलंस करुन या निवडणुकीला सामोर जावे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे उद्योजक उमेश चांदगुडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.