Chinchwad Bye Election : मागीलवेळी राहुल कलाटे यांनी लाखाच्यावर मते घेतली, यावेळी आम्ही जिंकू – संजय राऊत

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या 2019 च्या (Chinchwad Bye Election) निवडणुकीत अपक्ष लढलेल्या राहुल कलाटे यांनी लाखाच्यावर मते घेतली होती. यावेळी ही जागा आम्ही जिंकू. आम्हीच निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेला जागा द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेची बैठक झाली. त्याची माहिती देताना राऊत म्हणाले, चिंचवडची पोटनिवडणूक आम्हीच लढावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. चिंचवड येथील मतदारांचाही तोच हट्ट आहे. कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने कसे लढावे हे आपण ठरवू. मात्र चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी, असे आमचे मत आहे.

Chinchwad Bye Election : उमेदवारी जगताप कुटुंबातच; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत

राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मते मिळवली होती. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी चांगली झुंज दिली होती. यावेळी (Chinchwad Bye Election) ही जागा आम्ही जिंकू. महाविकास आघाडी आहे. चर्चेतून प्रश्न सुटतो. आम्हीदेखील अनेक जागांवर दावा करतो. चिंचवडची जागा राष्ट्रवादीने लढवावी असे मत राष्ट्रवादीचे आहे. अजित पवार यांनी याबाबत मत मांडले होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असावी, असे आमचे मत आहे, असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.