रविवार, जानेवारी 29, 2023

Chinchwad Bye Election : पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी घेणार पूर्वतयारी आढावा बैठक

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या (बुधवारी) (Chinchwad Bye Election) पिंपरी-चिंचवडमधील कोअर कमिटीची पूर्वतयारी आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती भाजपा शहर संघटक अमोल थोरात यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसांत अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 27 फेब्रुवारी  रोजी मतदान, तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.

E-waste :  पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताकदिनी ई-वेस्ट संकलन मोहीम

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. त्यावेळी शहराध्यक्ष, (Chinchwad Bye Election) आमदार महेश लांडगे, प्रदेश सरचिटणीस तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ‘कोअर कमिटी’तील पदाधिकाऱ्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

Latest news
Related news