Chinchwad Bye-Election : पहिल्याच दिवशी 20 उमेदवारी अर्जांची विक्री; ‘यांनी’ नेले अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 20 जणांनी अर्ज नेले. त्यामध्ये भाजप 1, राष्ट्रवादी काँग्रेस 3, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1, पिंपरी-चिंचवड (Chinchwad Bye Election) परिवर्तन विकास आघाडी 1, एमआयएम 1, वंचित बहुजन आघाडी 1 आणि अपक्ष 12 अशा 20 जणांनी अर्ज नेले आहेत. मात्र आज एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, अपक्ष सुधीर लक्ष्मण जगताप, बालाजी लक्ष्मण जगताप यांनी सुद्धा अर्ज नेले आहेत.  

Pune News : पुण्यात पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना दिली धडक

थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 20 व्यक्तींनी नामनिर्देशन पत्र नेले आहेत. नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवही मध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती नोंदवली जाते. यामध्ये दिनांक व वेळेसह नामनिर्देशन पत्र नेणाऱ्या उमेदवाराचे नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, राजकीय पक्षाचे संपूर्ण नाव, उमेदवाराचा प्रवर्ग, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याचे नाव, आदी बाबींची नोंद केली जाते. त्यानंतर नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन त्यास नामनिर्देशन पत्राची प्रत तसेच आचारसंहिता पुस्तिकेची प्रत दिली जात आहे.

‘यांनी’ नेले उमेदवारी अर्ज

भाजपच्या बायडाबाई उर्फ कल्पना सुखदेव काटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माया संतोष बारणे, संभाजी बाळासाहबे बारणे, राजेंद्र गणपत जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अॅड. अनिल बाळु सोनवणे, एमआयएमचे जावेद शेख, वंचित बहुजन आघाडीचे रविंद्र विनायक पारदे, (Chinchwad Bye-Election) पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे रावसाहेब शंकर चव्हाण, अपक्ष प्रफुल्ला शैलेंद्र मोनलिंग, हरीभाऊ उर्फ हरिष भिकोबा मोरे, भोसले मिलिंद राजे, रफिक रशिद कुरेशी, बाळु तुळसीराम शिंदे, दादाराव किसन कांबळे, वहिदा शहेनु शेख, अविनाश तुकाराम गायकवाड, अजय हनुमंत लोंढे, सुधीर लक्ष्मण जगताप, बालाजी लक्ष्मण जगताप, सालरभाई उमरसाब शेख अशा 20 जणांनी आज पहिल्यादिवशी अर्ज नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.