Chinchwad Bye Election : शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. शंकर (Chinchwad Bye Election ) जगताप यांचा ‘डमी’ अर्ज भरला असून आमच्या उमेदवार अश्विनी जगताप याच राहणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Pune News : स्थानिक ब्राह्मणांची भाजपावरील नाराजी झळकली बॅनरद्वारे

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या  भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज (सोमवारी) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले  भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

त्याबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डमी अर्ज भरावा लागतो. शंकर जगताप  यांचा डमी अर्ज आहे. अश्विनी जगताप याच आमच्या उमेदवार आहेत. (Chinchwad Bye Election )उमेदवार बदलू शकतो का असे विचारले असता ‘इथे बदल नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.