Chinchwad Bye-Election : किर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघात(Chinchwad Bye-Election) शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांना मतदान करण्यासाठी आग्रह धरावा यासाठी किर्तनाच्या माध्यमातून त्यांना मतदानाचे महत्व समजविण्यात आले.

श्री आनंद विद्या प्रसारक मंडळाच्या संचेती शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध कीर्तनकार गजानन व्हावंल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी मतदानाचे असलेले महत्व समजावले.

Lonavala News : लोणावळ्यात मोठी कारवाई; 342 पोती गुटखा व चारचाकी वाहन असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

विद्यार्थ्यांना मतदानासाठी कुटुंबातील पात्र मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शपथ देण्यात आली. विविध शाळांमधून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवडणूक नायब तहसीलदार श्वेता आल्हाट  यांनी मतदान जागृती उपक्रमाविषयी माहिती दिली. विद्यार्थीदेखील मतदान जनजागृतीत सहभागी होऊन (Chinchwad Bye-Election) लोकशाळी बळकट करण्यासाठी योगदान देऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश मोरे, शिक्षण अनिल शिंदे, उद्धव वाघमारे, क्रीडा शिक्षक हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.