Chinchwad Bye Election : मतदानाला सुरुवात; 510 केंद्रावर मतदान

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजता मतदानाला (Chinchwad Bye Election) सुरुवात झाली.  मतदारांचे स्वागत करून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत  510 केंद्रावर मतदान होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि आपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन  लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिव्यांग 12 हजार 313,  80 वर्षांवरील मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे.

Ahmednagar News : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग

 

तसेच अनिवासी भारतीय 331, सैनिक मतदार 168 या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत. मतदानासाठी 510 मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत. एक मतदान केंद्रावर सरासरी एक हजार 116 मतदार आहेत. सन 2019 च्या निवडणुकीत चिंचवडमध्ये 53.59 टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत किती टक्के मतदान होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मतदानासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यासाठी तीन हजार 707  पोलीस कर्मचारी व 725 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये 195 क्रमांकाचे मतदान केंद्र ‘सखी मतदान केंद्र’  आहे.

या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्या केंद्राची विशेष रचना तयार करण्यात आली आहे. रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील 23 क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 395 आणि 405 क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.