Chinchwad Bye-Election : कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार? राहुल कलाटे म्हणतात…

 एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज देणारे राहुल कलाटे आता पोटनिवडणुकही लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. अपक्ष उमेदवार अर्ज घेतल्यानंतर चिंचवडमध्ये सर्वच (Chinchwad Bye-Election) पक्षांची ताकद असून महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील (ज्या पक्षाला जागा सोडतील). त्या पक्षाकडून आपण निवडणूक लढविणार असल्याचे कलाटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चिंचवडची जागा महाविकास आघाडीतून कोणत्या पक्षाला सुटते. त्या पक्षाकडून कलाटे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.  

राहुल कलाटे यांची चिंचवड मतदारसंघात ताकद आहे. त्यांनी 2014 च्या निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढविली. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना शिवसेनेच्या पालिकेत गटनेते असलेल्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचितच्या पाठिंब्यावर लढत भाजपच्या लक्ष्मण जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. कलाटे यांनी 1 लाख 12 हजार मते मिळविली होती.

शिवसेनेची पोटनिवडणुकीबाबत बैठक सुरु असतानाच कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला. त्यामुळे यावेळीही कलाटे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले राहुल कलाटे म्हणाले, मी 2014 आणि 2019  मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत चिंचवडच्या जनतेसमोर उमेदवार म्हणून गेलो आहे.

The Action Hero’ movie : ‘द अॅक्शन हीरो’ चित्रपट ….एका प्रतिमेचा अजब खेळ 

महाविकास आघाडीने एकत्रित कामे केले. तर, मी आजही जनतेसमोर जाईल. अपक्ष अर्ज घेतल्याबाबत ते म्हणाले, अर्ज हा अपक्ष नसतो. तो ऑनलाईनही घेता येतो. (Chinchwad Bye-Election) चिंचवडमधील एकंदरित परिस्थिती पाहिली तर सर्वच राजकीय पक्षांची ताकद आहे. याठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब, अजितदादा आणि काँग्रेस पक्षाचीही ताकद आहे. प्रकाश आंबेडकर यांचीही ताकद आहे.

सर्वजणांनी एकत्रितपणे मिळून निर्णय घेतला. तर, त्याचा निश्चितच या निवडणुकीत फायदा होईल. ते एकत्रितपणे काय निर्णय घेतात. त्याची वाट पाहूयात. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबत विचारले असता, नेते निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील. त्या पक्षाकडून आपण निवडणूक लढविणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.