Chinchwad Bye-Election : घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविणार; आज अर्ज दाखल करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक (Chinchwad Bye-Election) ही बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढली जाईल. मात्र आमचा उमेदवार कोण असेल हे आज सकाळी दहा वाजता कळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी रात्री उशिरा किवळे येथे पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहोत. घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल.

उमेदवार राष्ट्रवादीचा असेल की आयात असेल असा प्रश्न केला असता हातवारे करत आयात असेल का? फलाना असेल का? तुम्ही काय मला मूर्ख समजता का? असा प्रश्न अजित पवार यांनी पत्रकारांना केला.

जो उमेदवार दिला जाईल त्याचे नाव उद्या सांगूच असे पवार यांनी सांगितले. आज मंगळवारी सकाळी दहा वाजता डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहे. यावेळी उमेदवारा सोबत स्वतः मी उपस्थित असणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Pune : अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करा; युवक काँग्रेसची मागणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.