Chinchwad : आसरा हॉटेलमधून चाळीस हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथे असलेल्या हॉटेल आसरा रेस्टॉरंट अँड बार मधून अज्ञात चोरट्यांनी हॉटेल फोडून चाळीस हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.

अजित सुरेश पवळे (वय 40, रा. काचघर चौक, निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित यांचे चिंचवड स्टेशन चौकात कुणाल प्लाझा येथे हॉटेल आसरा रेस्टॉरंट अँड बार आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी हॉटेल बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलच्या काउंटरमध्ये ठेवलेले चाळीस हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हॉटेल उघडण्याच्या वेळेस हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.