BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : लोणावळा-पुणे लोकलला 41 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाढदिवस साजरा

0 445
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोणावळा-पुणे लोकलला आज 41 वर्षे पूर्ण होत असून, 42 व्या वर्षानिमित्त चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनला पुष्पहार घालून तसेच प्रवासी आणि इंजिनचालकांना पेढे भरून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.

.

पुणे-लोणावळा दरम्यान दि.11 मार्च 1978 पासून पहिली युनिट लोकल सुरूवातील 4 डब्बे त्यानंतर 6, त्यानंतर 10 आणि आज 12 डब्यांची धावत आहे. आज 2019 साली सुमारे 2 लाखांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. लोकलच्या दोन्ही बाजूला दररोज 44 फेर्‍या होतात. यापैकी 4 फेर्‍या तळेगाव -पुणे दरम्यान होतात. आज चिंचवड रेल्वे स्थानकावर चिंचवड स्थानकप्रमुख अनिल नायर, ज्येष्ठ नागरिक दादासाहेब माने यांच्या हस्ते इंजिनाला पुष्पहार घालण्यात आले.

चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, लोकलने नियमित प्रवास करणारे प्रवासी रिया मंडल, अपूर्वा धावडे, संगिता चौधरी, प्रमिला चौधरी, मयुरी वावळे, विनोद जाधव यांच्या हस्ते रेल्वे इंजिनाची पूजा करण्यात आली. गुजराती समाजाचे उद्योजक हार्दिक जानी, नयन तन्ना यांनी रेल्वे इंजिन चालक संजय सांगवीकर आणि स्थानकप्रमुख नायर, सहाय्यक स्थानक प्रमुख निलकंठ सूर्यवंशी, प्रविण जाधव यांना पेढे वाटले, तसेच इतर प्रवासीयांना चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, शरद चव्हाण, प्रा.पोर्णिमा कदम, नंदु भोगले, इक्बाल सय्यद, जॉनी फ्रांसिस, निर्मला माने, नारायण भोसले, अ‍ॅड. मनोहर सावंत यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले.

  • आज चिंचवड रेल्वे स्थानकावर पुणे मार्गाकडे प्रवासी लोकलची वाट पाहत असताना आज नियमित ये-जा करीत असलेल्या लोकलचा वाढदिवस आहे. हे कळाल्यावरती सगळ्यांनाच विशेष आनंद झाला. वाढदिवस साजरा करण्याआधी विशेषतः महिला प्रवासी सरकारी, निमसरकारी कर्मचारी आदी वर्गांनी लोकल वाढ करून आज प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी, पुणे-लोणावळा दरम्यान दर 20 मिनिटाला लोकल सुटावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाकडे करण्यात आली.

सर्व लोकल वाढीसाठी लागणारी मदत देखील करू, असे उत्फुर्तपणे सांगितले. त्यावर चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने पुणे-लोणावळा दरम्यान 15 डब्याची लोकल सुरू व्हावी, दौंण्ड-लोणावळा लोकल, पुणे-मुंबई लोकल सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यातील प्रवासी मेळावे भरून प्रवाशांकडून सह्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाकडे देण्यात येईल, असे भालदार यांनी प्रवाशी यांना सांगून चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने 1989 ते आजपर्यंत आजी-माजी रेल्वे मंत्री, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक आदींना पाठपुरावा करीत असून, पुणे-लोणावळा दरम्यान चौपदरी रेल्वे मार्गाचे काम त्वरीत सुरू करावे, प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी भालदार यांनी सांगितले.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: