Chinchwad : चिंचवडच्या प्रयास ग्रुपच्या वतीने वटपोर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज – मराठी संसकृतीची परंपरा आणि सावित्रीच्यां निष्ठेंचे दर्पण अन् एकत्रित धाग्यांचे बांधलेले बंधन, असे आगळे वेगळे समर्पण प्रयास ग्रुप चिंचवडच्या ग्रुपनें केले. प्रयास ग्रुप चिंचवड महिलांचे खुले व्यासपीठ यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधूंन वटपौर्णिमेनिमित्त वटपूजन आणि वटवृक्षारोपण समारंभ चिंचवड येथील जिजामाता पर्यटन केंद्र येथे साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते वटपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यां मनिषा चिंचवडे होत्या. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ, सचिव माधुरी कवी प्रयास ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II
  • ग्रुपच्या अध्यक्षां शोभा निसळ यांनी “ वटपौर्णीमा ही वृक्षपूजा , निसर्गपूजा , व आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणारी परंपरा असूंन पर्यावरण, वैद्यकीय, सामाजिकदृष्या वड हा किती उपयुक्त आहे याचे उदाहरणं देऊंन “ वटवृक्षांच्या फांद्या तोडून वटवृक्षांचा प्राण घेण्यापेक्षां त्याचे वक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून आपला खरा सत्यवान प्रत्येक सावित्रीलां यातच लाभेल.” त्यास उदंड आयुष्य लाभेल असा संदेश दिला.

या मंगलप्रसंगी सुवासिनींना हळदीकुंकु व अनेक प्रकारच्या “ग्रीन अंम्ब्रेलां“ म्हणून वृक्षवाण देण्यात आले. तसेच सुप्रिया खासनीस लिखीत “ प्रयास विकासाची कहाणी “ वाचणेंत आली. कार्यक्रम संयोजन गितांजली बावळें, नंदा मोकाशी, संगीता पाटील, रेखा क्षीरसागर , निलीमा कांबळे, स्वाती जोशी, सुनिता किवडे आदींनी केले. आभार माधुरी कवी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.