Chinchwad : ‘झेप’ पुनर्वसन संस्थेतील विशेष मुलांचे स्नेहसंमेलन

एमपीसी न्यूज -चिंचवडमधील विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘झेप’ पुनर्वसन संस्थेचे स्नेहसंमेलन शनिवारी दि. 30 मार्चला चिंचवड येथे होणार आहे. विशेष मुलांचे हे अकरावे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे, अशी माहिती नेत्रा तेंडुलकर यांनी दिली.

चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी, (दि. 30 मार्चला) सकाळी दहा वाजता हे स्नेहसंमेलन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेबीजीव्हीएसचे डायरेक्टर विनोद देशमुख, टी.के. राजेश आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी हिमांशु नंदा हे देखील उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.