Chinchwad : तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक

Central Home Department Internal Security Service Medal to three officers : सलग दोन वर्षे नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत मिळाले पदक

एमपीसी न्यूज – सलग दोन वर्षे नक्षलवाद्यांविरोधात अती दुर्गम भागात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल केंद्रीय गृह विभागाकडून 2015 मध्ये जाहीर झालेले ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन अधिका-यांना प्रदान करण्यात आले.

पोलीस दलातील अधिका-यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बुधवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रागंणात हा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळालेल्या पोलीस अधिका-यांमध्ये चिंचवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मधुकर जाधव, वाकड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शंकर भोगम, भोसरी वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण अश्रुबा मिसाळ आदींचा समावेश आहे.

सर्व पदक विजेते अधिकारी हे सन 2010 ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उप-निरीक्षक पदाची परीक्षा पास उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात रुजु झाले आहेत.

त्यांनी ऑक्टोबर 2011 ते ऑगष्ट 2014 अशी सलग दोन वर्षे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, मुलचरा व चामोर्शि या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

या कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृह विभागाने 2015 साली त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले.

सूत्रसंचालन राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांनी केले.

  पोलीस आयुक्त बिष्णोई म्हणाले, यापुढेही आपण सर्व जण अशीच उत्तम कामगीरी करुन पोलीस दलाचे नाव उंचवावे. पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करुन पुढे जावुन राष्ट्रपती पदक मिळवण्याचा प्रयत्न करावा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.