Chinchwad : चांदगुडे प्रतिष्ठानच्या वतीने आज सत्संग मेळावा

एमपीसी न्यूज- स्वर्गीय गंगाराम चांदगुडे सेवा प्रतिष्ठान, कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी शाहू नवरात्र उत्सव 2018 साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मेळाव्याचे 21 वे वर्ष आहे.

या सत्संग मेळाव्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक येथील प. पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्संग मेळाव्यात कुलदेवी, कुलदैवत, बालसंस्कार, युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, आरोग्य, आयुर्वेद, सण वार या अनेक विषयावर चंद्रकांत मोरे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम आज (मंगळवारी) चिंचवड येथील शाहूनगर क्रीडांगणावर होणार आहे.

तसेच आज दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत सामुदायिक दुर्गा शप्तशती पारायण होणार आहे, तरी सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक उमेश चांदगुडे, महेश चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.