Chinchwad : स्त्री’चे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चंदूकाका सराफ यांचा ‘मिशन आद्या’ उपक्रम अतिशय स्तुत्य – नीता परदेशी

एमपीसी न्यूज – महिलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चंदूकाका सराफ यांच्या वतीने ‘मिशन आद्या’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. असे मत विमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी व्यक्त केले.

चंदूकाका सराफ यांच्या वतीने मिशन आद्या हा सॅनिटरी नॅपकिनचा उपक्रम राबविण्यात आला. त्यास ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नीता परदेशी बोलत होत्या. यावेळी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे संचालक सिद्धार्थ शहा, विमेन हेल्पलाईनच्या नीता परदेशी, स्नेहवन सामाजिक संस्थेचे अशोक देशमाने, दादा महाराज ट्रस्टचे अभय लिमये, प्रभा जाधव, विलास भुजबळ आदी उपस्थित होते.

नीता परदेशी म्हणाल्या, “चंदूकाका सराफ व्यवसायासोबत अनेक सामाजिक उपक्रम राबवते. त्यामुळे समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा”

सिद्धार्थ शहा म्हणाले, “मिशन आद्या अंतर्गत ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सॅनिटरी नॅपकिन जमा केले आहेत. जमा झालेल्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये आमच्या पेढीकडून तेवढ्याच सॅनिटरी नॅपकिनची भर घालण्यात येणार आहे. एकूण दोन लाख सॅनिटरी नॅपकिन समाजातील गरजू स्त्रियांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like