Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पूरसदृश परिस्थितीमुळे वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पवना, मुळशी ही धरणे पूर्णतः भरली असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आह. शहरातील वाहतूक खोळंबून याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पूरजन्य परिस्थितीमुळे सांगावी-औंध भागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गाने जाऊ नये, असे सांगण्यात येत आहे. तसेच राजीव गांधी पुलापर्यंत पाणी पोहचले आहे.

  • # जुनी सांगवी ते स्पायसर कॉलेज पुलापर्यंतचा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
    # सांगवी मधील सावित्रीबाई फुले गार्डन, कस्पटे चौक, वाकड नाका वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
    # काळेवाडी चौकाकडून मानकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
    # चाफेकर चौक ते मोरया गोसावी मंदिर आणि धनेश्वर मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
    # कुदळवाडी ते मोई हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
    # शेलपिंपळगाव येथे पाणी आले असल्याने काही भागातील वाहतूक बदलण्यात आली आहे.
    # शिक्रापूर ते चाकण हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
    # देहूरोडकडून मामुर्डी, सांगवडेकडे जाणाऱ्या लोखंडी पुलावर पाणी आले असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.