Chinchwad : सूसखिंडीतून पाषाणकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – सूसकडून सूसखिंडीतून पाषाणकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.

पाषाण-सुस येथील उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सूसकडून सूसखिंड ब्रिजवरून पाषाणकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग-मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जुना पाषाण-सूस उड्डाणपूल हा फक्त सूस गावाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हुंडाई शोरूमपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला आहे.

यासाठी पर्यायी मार्ग – सूसगावकडून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांकरिता हुंडाई शोरूम सूसरोड येथून सुपिरो इलाईट सोसायटी मार्गे ननवारे सबवेमधून पाषाणकडे व इच्छितस्थळी जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.