BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : डांगे चौकातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल; पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी सोडविणार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – डांगे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक पथारीवाले हातगाडीवाले यांचे अतिक्रमण वाढत आहे. तसेच रस्त्यांवर होणारे पार्किंग यामुळे वाहतूककोंडी होत आहे. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी डांगे चौकातील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी आज (मंगळवारी) दिले आहेत.

डांगे चौकातील वाहतुकीत करण्यात आलेले बदल हे प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले असून हे बदल 17 जुलै ते 31 जुलै या कालावधीत करण्यात येणार आहेत. दरम्यान 30 जुलैपर्यंत नागरिकांकडून सूचना आणि हरकती लेखी स्वरुपात मागवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या कार्यालयात त्यांच्या हरकती व सूचना लिखित स्वरूपात जमा करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

  • # रावेत कडून डांगे चौकात येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वाहण्यास व सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांनी डावीकडे वळून थेरगाव फाटा चौकातून इच्छित स्थळी जावे.

# बिर्ला हॉस्पिटल कडून येणाऱ्या वाहनांना डांगे चौकातून उजवीकडे वळून रावेतकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनचालकांनी सरळ जाऊन मयुरेश्वर गणेश मंदिर येथे यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

  • # भुमकर चौकातून येणाऱ्या वाहननांना डांगे चौकातून उजवीकडे वळण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहन चालकांनी थेरगाव फाटा चौकातून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

# डांगे चौकात चारही रस्त्यावर चौकापासून 100 मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग, नो हॉल्टिंग व नो हॉकर्स झोन करण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.