Chinchwad : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची सव्वाआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 8 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै 2017 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घडली.

मीरा भास्कर बटुळे (वय 50, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रावण लिंगाप्पा व्हटकर (वय 50, रा. संत गल्ली, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा यांचा मुलगा गोपाळ, मुलगी सुकन्या केंद्रे आणि जावई संजय केंद्रे यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी श्रावण याने मीरा यांच्याकडून वेळोवेळी सुमारे 8 लाख 34 हजार रुपये घेतले. आरोपीने पैसे घेऊन त्यांना नोकरी लावले नाही. तसेच पैसे देखील परत दिले नाहीत.

याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.