BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : केमिस्ट क्रिकेट लिग स्पर्धा उत्साहात

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – केमिस्ट असोसिएशनच्यावतीने दरवर्षी क्रिकेट लिग 2019 या स्पर्धा घेण्यात येतात. याही वर्षी ही स्पर्धा घेण्यात आली. मोठ्या प्रमाणात केमिस्ट क्रिकेट संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे उदघाटन सर्वात जेष्ठ केमिस्ट  जगदीश जमतानी,अन्न औषध प्रशासन  निरीक्षक सचिन कांबळे ,वेदप्रकाश गुप्ता, संजय गांधी   यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नंदू सांडभोर, कैलास दवे, आप्पा बिबवे, रामभाऊ गायकवाड, जयेश छाजेड, संदीप पारेख आदी  उपस्थित होते.
अटी तटीत झालेल्या या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक होलसेल संघ चिंचवड यांनी पटकावले. त्रिवेणीनगर या केमिस्ट संघाने द्वितीय बक्षीस पटकावले. मॅन ऑफ द मॅच,बेस्ट बॉलर,बेस्ट प्लेयर,मॅन ऑफ द सिरीज,बेस्ट झेल,अप्रतिम रण आउट,आदी पारितोषिके देण्यात आली.

या वेळी संघटनेचे अजय दर्डा, प्रवीण मुथा, मदन चौधरी, रवी कटारिया, राजू बाफना, प्रांजळ पाटील, राहुल शेंडगे, विशाल मुरकुटे, दीनदयाळ गुप्ता,अक्षय लुंकड, धनेश मुनोत, नरेंद्र आगरवाल, जगदीश चौधरी, गिरीश बाफना, नरेंद्र आगरवाल, प्रसाद शितोळे, धनेश बोरा, सतीश लोहकरे, शशिकांत माने, दीपक भागे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर बच्चे यांनी केले. संतोष खिंवसरा यांनी आभार मानले. स्पर्धेचे नियोजन सुरज चौधरी व मधुकर बच्चे यांनी केले. स्पर्धेचे समालोचन सुरज चौधरी व मधुकर बच्चे यांनी केली.

.

HB_POST_END_FTR-A1
.