Chinchwad : बनावट कागदपत्रांच्या आधारे केला बालविवाह; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बालविवाह करण्यासाठी बनावट (Chinchwad) कागदपत्रे तयार केली. त्याआधारे बालविवाह करून मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची फसवणूक केली. हा प्रकार 20 जून 2020 रोजी सायंकाळी वेताळनगर, चिंचवड येथे घडला.
गणेश भल्लाजी परिहार (वय 49, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी 7 जून 2023 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहबूब लियाकत अली शेख, अमीर पाशा शेख, पाशा शेख, जीशान पाशा शेख, इम्रान पाशा शेख (सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब याने पाशा, जीशान आणि इम्रान यांच्या मदतीने आमिर याचा बालविवाह फिर्यादी यांच्या मुलीसोबत लावण्याचे ठरवले. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, खोटे मुद्रांक, खोटा निकाहनामा, बनावट सह्या करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलीचा बालविवाह लावून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
Mahalunge : झोपेत असताना डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू