Chinchwad : काळसेकरकाकांकडून गरीब कुटुंबातील बच्चे कंपनीला मिळतोय सकाळचा नाश्ता

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचे प्रचंड हाल सुरु झाले. त्याही पेक्षा त्यांच्या चिमुकल्यांचे हाल अधिक प्रमाणात होत असल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते वासुदेव काळसेकर यांनी या मुलांना दररोज सकाळचा नाश्ता देण्यास सुरुवात केली. सलग पन्नास दिवस ते हा उपक्रम राबवित आहेत.

कोरोनाच्या महामारीमुळे देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. या लॉकडाऊनला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या तिसरा लॉकडाऊन सुरु असून त्याची मुदत ३१ मे आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचे प्रचंड हाल सुरु झाले. विशेषतः शहरातील झोपडपट्टी भागात याची तीव्रता अधिक जाणवली.

_MPC_DIR_MPU_II

अशा परिस्थिती अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती आणि महापालिका व शासनाच्यावतिने गरजुंना कोरडा शिधा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, गरीब घरातील बच्चे कंपनीला सकाळचा नाश्ता मिळणे कठीण होऊन बसले.

ही परिस्थिती काळसेकर यांना समजली. त्यानंतर त्यांनी तात्काळ शहरातील विविध झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या चिमुकल्यांना सकाळचा नाश्ता पुरविण्याचा उपक्रम सुरु केला.

गेली पन्नास दिवस ते हा उपक्रम न चुकता राबवित आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीही दररोज सकाळी त्यांची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळतात. तसेच  समाजातील विविध घटकांशीसह असंख्य गोरगरीब कुटुंबाकडून   काळसेकर यांचे कौतूक केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.