Chinchwad : चिंचवड रेल्वे स्थानकावर एर्नाकुलम, बलसाड, करमाला गाडीला दररोजचा थांबा देण्याची प्रवाशांची मागणी

एमपीसी न्यूज – नाताळ सणानिमित्त रेल्वे विभागाचे चिंचवड रेल्वे स्थानकावर काल दि.23 रात्रौ चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने उद्योजक व्यंकटेश देवगिरीकर व मनोहर जेठवाणी यांच्याहस्ते पुणे करमाला रेल्वे गाडीच्या इंजिनाला हार घालून स्वागत करण्यात आले.

तसेच चिंचवड रेल्वे स्थानकावरून एर्नाकुलम व करमाला गाडीने इच्छित स्थळी जाणार्‍या प्रवाशांना पेढे, गुलाबाचे फुल देऊन त्यांना नाताळ सणाच्या व सुखकर प्रवासासाठी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी मुकेश चुडासमा, ज्योती डोळस, संगीता जाधव, निर्मला माने, नारायण भोसले, शरद चव्हाण, सूरज आसदकर, जॉनी फ्रान्सीस, राम सुपेकर, राजेश राजकुमार आदींनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रवाशांनीही देखील चिंचवड प्रवासी संघाचे विशेष कौतुक करून सांगितले की आम्हाला गाडी पकडायला पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागते. रस्ते मार्गाने वाढती गर्दी, वाहतूकीची सततची कोंडीमुळे आम्हाला वेळेत पुणे रेल्वे स्थानकावर पोहचू की नाही, अशीच सतत मनात भीती वाटायची पिंपरी-चिंचवड शहरात कोकण, गोवा, त्रिपूर, उडपी, मेंगलोर येथील प्रवासी मोठ्या प्रमाणात राहतात. सुट्टीच्या व सणांच्या हंगामात धावणारी गाडीला दररोज थांबा मिळण्यासाठी चिंचवड प्रवासीसंघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रवासी शिनोज नंबीयार, श्रीधरन नंबीयार, वनजा श्री, कोकणचे प्रवासी अनिल गायकवाड, गजानन चौघुले तर करमालीचे प्रवासी सुरेश भाटी, जिसूलाल परमार आदींनी केले.

उद्योजक व्यंकटेश देवगिरीकर यांनी रेल्वे इंजिन चालक जयंत शेडे, गौती कुमार यांना पुष्पगुच्छ, पेढे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रेल्वे विभागाचे यातायात निरीक्षक संजय कुमार, चिंचवड रेल्वेस्थानक प्रमुख अनिल नायर, आर.के.तांबे, शोभा वर्मा, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल आर.जाधव आदी उपस्थित होते.

चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी चिंचवड रेल्वे स्थानकावरील पादचारी जिना लवकर पूर्ण व्हावा, सरकत्या जिन्याची महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला आदींसाठी सोय करण्यात यावी. आज इंदौर, नांदेड, पनवेल गाडीला प्रचंड गर्दी असते अनेकांबरोबर सामान असते. त्यांची होणारी गैरसोय दूर करावी, तसेच नांदेड, पनवेल गाडी पुढे वसईपर्यंत नेण्यात यावी आदी प्रवाशांच्या मागण्या मांडल्या. त्यांनी वरिष्ठांपर्यंत मागण्या पाठविण्याचे यावेळी संघाला आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.