Chinchwad : चिंचवड रेल्वेस्टेशनवर आता कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड

चिंचवड प्रवासी संघाची मागणी मान्य 

एमपीसी न्यूज- चिंचवड रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सोमवारपासून कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. चिंचवड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर हा बोर्ड लावण्यात आला आहे. या सुविधेमुळे चिंचवड प्रवासी संघाची मागणी अखेर मान्य झाली आहे. 

चिंचवड रेल्वे स्थानकात दररोज अनेक रेल्वे गाड्या थांबत असतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपले आरक्षण असलेला दाब नेमका कुठे लागतो हे काळात नव्हते. त्यामुळे गरोदर महिला, वयोवृद्ध प्रवासी, आदींची फलाटावर पळापळ होत असे. या डिस्प्ले बोर्डमुळे प्रवाशांना आपला डबा कोठे असणार याची आधीच माहिती कळून त्याची गैरसोय दूर होणार आहे.
  • या डिस्प्लेबोर्डच्या मागणीसाठी चिंचवड प्रवासी संघाने अनेकदा पत्रव्यवहार करून मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. या सुविधेमुळे चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, नारायण भोसले, निर्मला माने, जबीन इफ्तेखारी, अ‍ॅड. मनोहर सावंत, तात्या मंजूगडे, मुकेश चुडासमा, सूरज आसदकर, नंदू भोगले, उषा दामले, शरद चव्हाण आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.