Chinchwad : चिंचवड, चिखलीत घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चिंचवड व चिखली येथे घरफोडी केली. या दोन्ही घटनांमध्ये 4 लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

चिंचवड येथील घटनेप्रकरणी श्रीकांत धोंडीराम कुलकर्णी (वय-48, केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर 23 ऑक्टोबर रोजी बंद होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा 3 लाख 29 हजारांचा ऐवज चोरून नेला.

चिखली येथील घटनेप्रकरणी महेश अरूण थोरगुले (वय-31, रा. कोयनानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर 24 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. मात्र, त्यांच्या घराच्या किचनची खिडकी उघडी राहिली होती. या उघड्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे, चांदीचे दागिने, प्ले स्टेशन, थ्रीडी, कंट्रोलर असे 1 लाख 41 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. चिंचवड आणि चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.