Chinchwad : गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून (Chinchwad)छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.8) वाल्हेकरवाडी येथे दुपारी करण्यात आली.

भैय्या पुरुषोत्तम आव्हाड (वय 24 रा.चिंचवड), (Chinchwad)मारुती सुग्रीव कुंडगीर (वय 18 रा. चिंचवड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी फिर्याद दिली आहे.

 

Pune : अमित ठाकरे यांच्या बैठकीत लोकसभेसाठी वसंत मोरे यांच्या नावावर चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीर रित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरत होते. यावेळी त्यांनी कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतली नव्हती, जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी निष्काळजीपणे व बेकायदेशीरपणे गॅस ट्रान्सफर करत असल्याने चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्याच्यांकडून 1 लाख 17 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.