Chinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण

एमपीसी न्यूज – घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत सोमवारी (दि. 14) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत बापू गालफाडे (वय 18) व त्याचे तीन अनोळखी साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत काहीजण दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भांडण झाले. त्यावेळी आरोपी गालफाडे आणि अन्य तीन जणांनी फिर्यादी प्रशांत पागोडे त्यांची आई आणि चुलत्याला आरोपींनी मारहाण करून जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.