chinchwad : चिंचवड पोलिसांकडून टाळ्या वाजवून वैद्यकीय विभागाचे आभार; नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी कोरोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय विभागाचे व अन्य यंत्रणेचे टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देखील दिला.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. अहोरात्र झटणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी रविवारी दुपारी पाच वाजता आपापल्या घरासमोर येऊन टाळ्या वाजवून आभार व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.

तसेच अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी सुद्धा आभार व्यक्त केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.