Chinchwad: शिवसेना उपशहरप्रमुखाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील किवळे-मामुर्डी परिसरातील शिवसेनेच्या एका उपशहरप्रमुखाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट रविवारी (दि.24) पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना मदतीची गरज होती. संकटाच्या काळात या पदाधिकाऱ्याने आपल्या भागातील गरजूंना मोठी मदत केली

. दरम्यान, या पदाधिकाऱ्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्याचे रिपोर्ट रविवारी आले आहेत. शिवसेनेच्या या 40 वर्षीय पदाधिकाऱ्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मदत करत असताना त्यांचा अनेक नागरिकांशी संपर्क आला.

त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून गरजूंना मदत केली जात आहे. मदत करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.