Chinchwad : जानकीदेवी बजाज संस्थेच्या समाज सेवा केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या समाज सेवा केंद्राचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एकात्म, ध्यास वैविध्यतेचा अशी थीम घेऊन कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती.

चिंचवड येथे झालेल्या या वर्धापनदिन कार्यक्रमात विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील वेगवेगळ्या कला/नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. पाच वर्षापासून पंच्याहत्तर वर्ष वयाच्या जवळपास तीनशे कलाकारांनी सहभाग घेतला होता. विविधतेतून एकात्म कसे साधता येते याचा उलघडा निवेदन आणि सादरीकरणातून झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख पाहुण्या वंचित विकास या संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर या होत्या. कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे एकता आहे आणि मुले समाजाला खूप मोठा हातभार लागत आहे. मनोरंजक पण सामाजिक संदेश देणारा हा वर्धापनदिन आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी ४५ वर्षाचा एकत्रित अहवाल असणारे समाजसेवा केंद्राचे पत्रक प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमास बजाजच्या शेफाली बजाज, संस्थेचे अध्यक्ष सी.पी.त्रिपाटी, ब्रिगेडियर जठार, मुद्देबिहाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक सुधीरकुमार पांडे, सचिव मुखर्जी आदी उपस्थित होते. ४५ वर्षापासून येथे समाजभिमुख विधायक उपक्रम राबविले जातात. शहरी भागात गरजूंसाठी विविध उपक्रम राबवित आहोत, असे त्यांनी सांगितले.

समाज सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन यशस्वी होणा-या तीन जणांचा यशस्वी वाटचाल या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सर्व शिक्षकांचा यामध्ये मोलाचा सहभाग होता. समन्वयक स्वाती देशपांडे यांनी सुत्रासंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.