Chinchwad : नागरिकांनो, ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या !

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात नागरिक ऑनलाईन व्यवहार आणि सर्चींग करण्याला पसंती देत आहेत. मात्र, आपण करत असलेला व्यवहार तसेच इंटरनेटच्या मायाजालात शोधत असलेली माहिती सुरक्षित आहे का?, याची खातरजमा करून व्यवहार करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर शाखेकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन व्यवहार करताना तसेच कोरोना आजाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक विविध वेबसाईटचा शोध घेत आहेत. यातून त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी इंटरनेटच्या मायाजालात फेरफटका मारताना अतिशय काळजीपूर्वक आणि शहानिशा करून व्यवहार करायला हवेत.

पिंपरी-चिंचवड सायबर शाखेने दिलेल्या काही महत्त्वपूर्ण टिप्स –

# कोणत्याही फोन कॉलला पेटीएम केवायसी करिता प्रतिसाद देऊ नये. कारण पेटीएम कधीच केवायसीसाठी ग्राहकाला संपर्क करीत नाही.

# संचारबंदीमध्ये घरात असताना मोकळा वेळ आहे, म्हणून माहीत नसलेला कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नये. तसेच कोणत्याही लिंकला क्लिक करून ती ओपन करण्याचा प्रयत्न करू नये. अनोळखी वेबसाईटला व्हिजिट करू नये. त्यावरून आपले मोबाईल व संगणकामधील डेटा, बँक डीटेल्स, व्हाट्सअप, फेसबुक व गॅलरीतील फोटो वगैरे माहिती चोरीला जाऊ शकते.

_MPC_DIR_MPU_II

# कोरोना व्हायरसची माहिती घेण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकला क्लिक करू नये. कारण त्यामुळे मोबाईल व संगणकामधील माहिती शेअर होऊन आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते. अनोळखी व्यक्तीकडून पैसे स्वीकारण्याची ऑनलाइन रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नये.

# कोणत्याही अनोळखी नंबरद्वारे पैशाचे, नोकरीचे, लॉटरीचे, कमी व्याजात मोठ्या कर्जाचे, गुंतवणुकीचे व ओएलएक्स वरून खरेदीचे आमिष दाखवले जात असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच त्यांच्या सांगण्यावरून आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून कोणतेही एप्लीकेशन डाउनलोड करू नये. उदा. क्विक सपोर्ट, एनी डेस्क टीम व्ह्यूवर, रिमोट डेस्क आदी.

# आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती 16 अंकी नंबर, पिन क्रमांक, ओटीपी क्रमांक इत्यादी कोणालाही देऊ नये. लक्षात ठेवा अशा माहितीसाठी बँक कधीही खाते धारकास कॉल करीत नाही.

# सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक माहिती उदा. जन्मतारीख, जन्मस्थान, पूर्वीचे नाव, लोकेशन किंवा कौटुंबिक तपशील, फोन नंबर, पत्ता देऊ नये.

# इंटरनेटचा वापर करताना आपल्या ओळखपत्राची माहीती (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) अनोळखी माणसांना किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर देऊ नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.