Chinchwad: मतदारसंघातील नागरिकांना मिळणार घरपोच भाजीपाला

7507411111 या हेल्पलाइनावर एक दिवस अगोदर करा मागणी 

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना घरपोज भाजीपाला मिळणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर ‘ऑर्डर फ्रॉम होम’ सेवा सुरू केली आहे. नागरिकांनी त्यांना लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी एक दिवस आधी नोंदविणे गरजेचे आहे. ही नोंदणी 7507411111 या हेल्पलाइन क्रमांकावर आपल्या संपूर्ण पत्त्यासह व्हॉट्सअॅपद्वारे करावी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांनी मागणी केलेला भाजीपाला दारापर्यंत ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर पोहोचविण्यात येईल.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे गरजेचे आहे. देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, नागरिक बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे चिंचवडमधील नागरिकांसाठी ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर ऑर्डर फ्रॉम होम सेवा सुरू केली आहे. त्यासाठी फक्त एकच अट घालण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांना लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी एक दिवस आधी नोंदविणे गरजेचे आहे. ही नोंदणी 7507411111 या हेल्पलाइन क्रमांकावर आपल्या संपूर्ण पत्त्यासह व्हॉट्सअॅपद्वारे करावी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांनी मागणी केलेला भाजीपाला तुमच्या दारापर्यंत ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर पोहोचविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.