Chinchwad: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या काळेवाडीतील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवेसना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या काळेवाडीतील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

काळेवाडी पुलाजवळील लकी बेकरी येथून या पदयात्रेला सुरूवात झाली. मुख्य रस्त्याने ज्योतिबा मंगल कार्यालय, पाचपीर चौक पुढे रहाटणी फाट्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.

“एखाद्या मतदारसंघाचा विकास कसा करावा, हे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात विकासकामे केली. चिंचवड मतदारसंघात झालेला विकास हा सर्वसामान्यांचा विकास आहे. या मतदारसंघातील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात असा त्यांचा प्रयत्न असतो, असे नगरसेविका निता पाडाळे म्हणाल्या.

माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे? याची जाणीव ठेवून मतदारसंघात विकासकामे केली आहेत. मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले. अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like