Chinchwad : पत्नी जास्त दिवस माहेरी राहिली म्हणून सासू-सास-यांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – मुलांच्या शाळेला सुट्टया असल्याने पत्नी खूप दिवस माहेरी राहिली याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या फोनवर अश्लील मेसेज पाठवून सासू-सास-यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 31 मे रोजी घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली. त्यानुसार पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने काही दिवस माहेरी गेल्या. माहेरी जास्त दिवस राहिल्याने पतीने त्यांना फोन केला आणि मेसेज केले. तसेच फिर्यादि महिलेला ‘ घरी येवू नकोस, माहेरीच रहा.’ असे सांगितले. त्यानंतर महिलेने पतीच्या फोनला उत्तर दिले नाही.

पत्नी फोनला उत्तर देत नसल्याने पतीने पत्नीला कन्नड आणि इंग्रजी भाषेत अश्लील शिविगाळ केली. तसेच सासु-सास-यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. हा गुन्हा चिंचवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.