Chinchwad : कुल्फी विक्रेत्याला मारहाण प्रकरणी नगरसेवक शीतल शिंदे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

एमपीसी न्यूज – कुल्फी विक्रेत्याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केल्याच्या आरोपावरून नगरसेवक शीतल शिंदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना 8 जून रोजी चिंचवड येथील अहिंसा चौकात घडली होती.

किशन देवजी गाडरी (वय 35, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) या कुल्फी विक्रेत्याने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन हे कुल्फी विकण्याचा व्यवसाय करतात. नगरसेवक शिंदे यांनी गाडरी यांना गाडी लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. याबाबत गाडरी यांनी चिंचवड पोलिसात तक्रार दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.