BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क करा आता ‘ट्विटर’वर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना पोलिसांशी सोशल माध्यमातून संपर्क करता यावा. तसेच पोलिसांचे उपक्रम, आवाहन आणि सूचना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ट्विटर अकाउंट सुरु केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यामधील संवाद वाढावा, यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. नागरिकांना त्यांच्या तक्रारी, सूचना पोलिसांना तत्परतेने मांडता याव्यात, यासाठी आता ट्विटर अकाउंट सुरु करण्यात आले आहे.

  • Pimpri Chinchwad Police असे ट्विटर अकाउंटचे प्रोफाइलचे नाव आहे. तर @PCcityPolice या नावाने नवीन ट्विटर अकाऊंड सुरु करण्यात आले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून पोलीस आणि पिंपरी-चिंचवडकरांचा संपर्क वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिसांच्या कामकाजाची व कामगिरीची माहिती नागरिकांना मिळावी. हा याचा उद्देश आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अकाउंट सुरु करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.