Chinchwad Corona News : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कोरोनाचा पाचवा बळी

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे करोनाने निधन झाले. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कोरोनाचा हा पाचवा बळी आहे.

बाळकृष्ण मारूती नरळे (वय 49) असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नरळे यांना 29 एप्रिल रोजी श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे केलेल्या तपासणीत ते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांना वानवडी येथील सर्दन कमांड रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरवातीपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

नरळे यांना यापूर्वी किडनीचाही आजार असल्याने त्यांच्यावर याबाबत थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या ते दिघी आळंदी वाहतूक विभागात कर्तव्यावर होते.

आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पाच पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.