Chinchwad: बिर्ला हॉस्पिटल मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी केली ‘योग’ साधना

Chinchwad: Corona positive patients at Birla Hospital practice 'Yoga' योग अभ्यास हा शतकानुशतके शरीराचे कार्य योग्य पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी केला जातो.

एमपीसी न्यूज- आदित्य बिर्ला हॉस्पिटल मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी रविवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हॉस्पिटलमध्येच ‘योग’ साधना केली.

योग प्रशिक्षक रचना दास यांनी या रुग्णांना योगा’चे थडे दिले. याप्रसंगी आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे वरिष्ठ सल्लागार वेंकटेश दत्त आणि हॉस्पिटलचे पॅरामेडिकल कर्मचारी उपस्थितीत होते.

योग अभ्यास हा शतकानुशतके शरीराचे कार्य योग्य पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी केला जातो. योग्य पद्धतीने सराव केल्यास योगामुळे शरीराला सकारात्मक उर्जा मिळते तसेच शरीर लवचिक होते.

काही विशिष्ट योगासने रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे नियमित योगासने करायला हवीत अशी सूचना यावेळी रुग्णांना करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.