Chinchwad Crime : वाल्हेकरवाडीत भरदिवसा 81 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथे नंदनवन सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून 81 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी बारा ते रात्री साडेसात वाजताच्या कालावधीत घडली.

हनुमान राजेभाऊ सटाले (वय 27, रा. नंदनवन सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सटाले त्यांच्या घराला कुलूप लाऊन शुक्रवारी दुपारी बारा वाजता गावी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून 40 हजारांचे नेकलेस, 38 हजारांचे सोन्याचे मणी, सोन्याचे पदक, तीन हजारांची रोख रक्कम असा एकूण 81 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.