Chinchwad Crime : उघड्या दरवाजावाटे चोरी करून 96 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 96 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 22 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

प्रतिमा सत्यवान रासकर (वय 25, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत बुधवारी (दि. 4) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रासकर यांच्या घराच्या उघड्या दरवाजा वाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातून 96 हजार रुपये किमतीचे 24 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये सोन्याचे पेंडल आणि पट्टागंठन होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.