Chinchwad Crime : सोशल मीडियावरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याबाबत एकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसीम कमाली शेख (रा. बिजलीनगर, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ बनवणे, पाहणे आणि ते प्रसारित करणे गुन्हा आहे. आरोपी वसीम शेख याने 30 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केले.

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ तयार करणे, प्रसारित करणे यावर एक संस्था निगराणी करत आहे. वसीम शेख याने प्रसारित केलेल्या व्हिडीओची माहिती संबंधित संस्थेला मिळाली. संस्थेने दाखल केलेल्या अहवालावरून वसीम शेख याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ब), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.